Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने (BJP Government) प्राधान्य दिले. उर्वरित प्रश्नही सत्ता आली असती तर सोडवले असते. पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

नवी मुंबई (Navi Mumbai) येथे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भाजप सरकारच्या काळात कामगारांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले गेले नाही.
कामगार हिताचे निर्णय घेण्यात आले. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. काही प्रश्न उरले होते.
सत्ता असती तर तेही सोडवले गेले असते.
केंद्र सरकारशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली जाईल,
असे केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
त्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले.
या पोर्टलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 60 लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik), मंदा म्हात्रे (Manda Mhatre), शशिकांत शिंदे (shashikant shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), निरंजन डावखरे (niranjan davkhare) व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Titel :- Devendra Fadnavis | BJP will get another chance in maharashtra former chief minister devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं

Pune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर