Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल – फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात तीन पक्षांनी भाजप विरोधात आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा आवाका कमी झाला आहे. दुसरीकडे भाजपला संपूर्ण राज्यात पक्षविस्ताराची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी युतीत आमची 25 वर्षे सडली असे वक्तव्य केले होते. त्यालाही फडणवीस यांनी यावेळी उत्तर दिले. आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता,असे त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेच्या नेत्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके (Pune Zilla Parishad Member Asha Buchke) यांनी गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले,राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने भाजपला पक्षविस्ताराची मोठी संधी चालून आली आहे. युतीत हि संधी मिळत नव्हती. पण आता मिळाली आहे. तीन पक्ष एकत्र आल्याने त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. सत्तारुढ पक्षातून आशाताईंसारख्या कार्यकर्त्या भाजपमध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आशाताई तुमचा श्वास जसा कोंडत होता तसा शिवसेनेशी असलेल्या युतीमुळे आमचाही काही
ठिकाणी श्वास कोंडत होता.भाजपमध्ये आतला-बाहेरचा, जुना-नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो, आशाताईंचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल. असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेत बुचके यांना न्याय मिळाला नाही. परंतु भाजपमध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ व त्यांना आमदार झालेले पाहू.

हे देखील वाचा

OBC Lists | आता राज्यांना मिळाला OBC यादी बनवण्याचा अधिकार, राष्ट्रपती कोविंद यांनी दिली मंजूरी; आता विधेयक बनले कायदा

MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Devendra Fadnavis | bjp will get power on its own devendra fadnavis has belief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update