Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंच्या पत्रकारांबाबतच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यावर फडणवीस म्हणाले…

मुंबई : Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना पत्रकारांबाबत केलेले वक्तव्य सध्या व्हायरल होत असून यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपाविरोधात पत्रकारांनी बातम्या छापू नयेत, म्हणून पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा प्यायला न्यावं, ढाब्यावर जेवायला न्यावं, असे बावनकुळे यात म्हणत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करणारी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule)

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटते की, बावनकुळे काय म्हणतायत आणि त्याचा काय अर्थ निघतो, या दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. त्यामुळे तसा अर्थ काढण्याचे काहीही कारण नाही. दुसरे म्हणजे राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांबरोबर असताना अनेकदा काही गोष्टी व्यंगात्मक बोलतात, त्या गोष्टी त्याच अर्थाने घ्यायच्या नसतात. बावनकुळेंच्या मनात कुठेही अशाप्रकारचा हेतू नाही. त्यामुळे त्यावर वाद निर्माण करणे अतिशय चुकीचे आहे. (Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule)

काय आहे प्रकरण
अहमदनगरच्या सावेडी येथे आयोजित भाजपा पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बावनकुळे म्हणाले, पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचे म्हणजे काय ते तुम्हाला समजलेच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय, त्या बूथवर इलेट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या.

आपण इतके चांगले काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत,
त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचे.
त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचे, असे बावनकुळे म्हणाले. या वक्तव्यावरून सध्या राज्यात खळबळ उडाली असून
विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Auction Sealed Properties PMC Property Tax Due | मिळकतकर थकल्याने सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती