‘महाराष्ट्राचे सेवक’ बनले देवेंद्र फडणवीस, ट्विटर ‘प्रोफाइल’ मध्ये केला बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता नाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमध्ये बदल केला आहे. आता पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री असे लिहिलेले होते. मात्र आता ते काढून त्या जागी महाराष्ट्र्र सेवक असे लिहिण्यात आले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत म्हणून त्यांच्याकडून हा बदल करण्यात आलेला असावा.


राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्या संधर्भात सीफारीश केल्या नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीला मंजुरी दिली. यानंतर राज्यात सर्व पक्षांमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी हालचाही सुरु झाल्या आहेत. मात्र शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ जाताना दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयात पोहचला सत्ता संघर्ष
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला अधिक वेळ दिला आणि शिवसेनेला कमी वेळ दिल्याचे सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like