Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले – ‘परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी शांतता राखावी’ (व्हिडीओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रामनवमीच्या (Ram Navami) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटात तणाव (Dispute) निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी (Chhatrapati Sambhaji Nagar Police) कारवाई केल्यानंतर या भागात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर मध्ये परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar News) मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही लोक याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत
ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. काही जण चुकीचे बोलत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा लागेल, शहरात शांतता ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | chhatrapati sambhaji nagar dispute between two groups first reaction of home minister devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 17 लाखांना लुबाडणार्‍या वकिलाला अटक; हनी ट्रॅप करणार्‍या तरुणीवर FIR

Union Minister Amit Shah | ‘शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती म्हणून…’, अमित शहांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले