Devendra Fadnavis | ‘शिवराज्याभिषेक’ दिनाचे औचित्य साधून देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले… (व्हिडिओ)

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे (Shivrajyabhishek Din 2023) 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर (Raigad Fort) राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारनं (Government of Maharashtra) आज किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार असल्याची माहिती दिली.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1664501767437189122?s=20

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह लोकप्रतिनीधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून आपल्याला
राज्याभिषेक सोहळ्याला येण्याची संधी मिळाली. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जगभरातून लोक आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत.

Advt.

फडणवीस पुढे म्हणाले, या राज्याभिषेकाने कॅलेंडर बनवलं. राज्याभिषेकाने नवी नाणी तयार केली.
गडकिल्ल्यांना नव अस्तित्व दिलं. भाषा शुद्धीकरणाचे प्रयत्न केले.
आता छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेव्हीच्या (Indian Navy) राजमुद्रेवर ठेवली आहे.
अगोदरची परकीयांची राजमुद्रा काढली आहे.
आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीला झाले पाहिजे अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title : Devendra Fadnavis | Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Din 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस : वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती