Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या सिबील स्कोअरचा (Cibil Score) बाऊ करून, कर्ज (Bank Loan) नाकारणाऱ्या बँकांना धडा शिकवा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या (State Government) भूमिकेला मानत नाही, अशा बँकांना झटका द्यावाच लागेल आणि त्यासाठी एक तरी एफआयआर (FIR) केला पाहिजे, अशा शब्दात देवेंद्र पडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर संताप व्यक्त केला.

राज्य सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कृषीमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

शेतकऱ्यांना कर्ज (Farmers Loan) देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्ज देताना शेतकऱ्यांची अडकवणूक झाली किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास, अशा बँकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेत. तसेच, बँकांनी सरकारचे आदेश मानले नाहीत तर, त्यांना झटका द्यावाच लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

फडणवीस पुढे म्हणाले, बोगस बियाणे आणि बोगस खतं शेतकऱ्यांकडे पोहोचतात.
त्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात. त्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
बँका राज्य सराकरच्या भूमिकेला मानेत नाहीत. मात्र येथून पुढे असं झालं तर त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.
या बँकांना झटका दिल्याशिवाय जमणार नाही.
राज्यात लागू असलेली सौर ऊर्जा कृषी पंप योजना (Solar Powered Agriculture Pump Scheme) ही आता केंद्र सरकार (Central Government) देशभर राबवणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | cm eknath shinde dcm devendra fadanvis on kharip crop insurance and bank agriculture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा