Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी?, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : (Devendra Fadnavis) महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव किती आहे हे जाणून घ्यायचे झाले तर गेल्या १२ वर्षातील स्वाइन फ्लूची आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. १२ वर्षात स्वाईन फ्लूचे जेवढे रुग्ण आढळले तेवढे कोरोनाचे एका दिवसात रुग्ण आढळले आहे. राज्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवली जात असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र खरीच अशी परिस्थिती आहे का? हे जाणून घेण्यासाठी आयसीएमआर, केंद्र शासन, खासगी आणि सरकारी सेवेतील कर्मचारी यांचे आपापसातील संबंध लक्षात घेतले पाहिजेत.

Corona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का? ‘या’ कारणामुळं बळावला संशय

बायोमेडिकलमध्ये संशोधन, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी काम करणारी, केंद्र सरकारच्या सहकार्याने बनवलेली आयसीएमआर ही देशातील सर्वोच्च संस्था आहे.
कोणत्या शहरात किती रुग्ण आहेत, किती रुग्णांचा मृत्यू झाला, त्यासाठी काय उपाययोजना कारवाया लागतील यासाठी आयसीएमआर या शिखर संस्थेची केंद्र सरकारने मदत घेतली.
यासाठी आयसीएमआरने एक पोर्टल तयार केले.
त्याद्वारे छोट्या गावातल्या कोरोना हॉस्पिटलपासून ते तपासणी करणाऱ्या लॅबपर्यंत, सगळ्यांना नोंदणी या पोर्टलवर होत आहे.
या नोंदणीचे काम देशभरातील खासगी आणि सरकारी रुग्णालये, लॅबमधील कर्मचारी-अधिकारी यांच्यावर सोपवली.
यामुळे नोंदणीची जबाबदारी आयसीएमआरची नाही.

Pune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डयावर छापा, लाखाचा मुद्देमाल जप्त मात्र संबंधित बीट अमलदाराचे दुर्लक्ष

आता राहिला प्रश्न आकडेवारी चुकीची की बरोबर याचा. महत्त्वाचे म्हणजे या पोर्टलवर एखाद्या व्यक्तीची कोरोना तपासणी केल्यापासून ते त्याचा अहवाल त्याचबरोबर तो बरा होणे, किंवा त्याचा मृत्यू होणे इथपर्यंतचा सगळा प्रवास याच नोंदवला जातो.
मात्र दरम्यानच्या काळात, बाधितांचा आकडा वाढत गेला.
त्यामुळे नोंदणी ऐवजी प्रथम रुग्णसेवा अशी भूमिका खासगी रुग्णालयांनी घेतली.
त्यावेळी अनेक खासगी हॉस्पिटल्सनी नोंदणी केली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता. त्यामुळे त्यांना अशी नोंदणी करता आली नाही. ‘रिअल टाइम डेटा अपडेशन’ हि प्रक्रिया महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांमध्ये नीट झालेली नाही. आपल्याकडे डेटा मॅनेजमेंट हा पूर्णपणे दुर्लक्षित विषय आहे.एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत किमान चार लोकांची टीम आहे. त्यात जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, साथरोगतज्ज्ञ, डेटा मॅनेजर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशी चार पदे आहेत.

Protein deficiency Signs | प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ 12 लक्षणे समजून घ्या, ताबडतोब सेवन करा ‘हे’ 10 पदार्थ

अनेक जिल्ह्यांत ही पदे याआधी भरलेली नव्हती. त्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणात माहिती समोर येत होती, ती संकलित करणे, व्यवस्थित नोंद करणे, आणि त्यातून निष्कर्ष काढणे या गोष्टी राज्यात आणि देशपातळीवरही बिनचूकपणे झाल्या नाहीत. आयसीएमआरच्या पोर्टलवर महाराष्ट्रातील ज्या खासगी दवाखान्यात ही माहिती अपडेट केली नाही,त्यांच्याकडून माहिती गोळा करणे, पोर्टलवर जमा करणे, आणि त्यानंतर नेमके किती लोक मृत्युमुखी पडले, किती बरे झाले, याची आकडेवारी तयार करणे यामध्ये बराच वेळ जाऊ लागला. परिणामी रोजच्या रोज खरी आकडेवारी कधीही समोर आलेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अनेक खासगी लॅब चालकांनीही हि आकडेवारी पोर्टलवर नोंदवण्यात दिरंगाई केली.
असाच प्रकार ग्रामीण भागातही झाला. त्यामुळे अँटीजेन टेस्ट झाल्या मात्र त्याची नोंद पोर्टलवर झाली नाही.
दरम्यान या नोंदी व्यवस्थित होत आहे कि नाही याच्या तपासणीसाठी एक यंत्रणा उभी करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही.
सुरुवातीच्या काळात एमबीबीएस झालेल्या तरुण डॉक्टरांकडे महाराष्ट्रात डेटा एंट्री करण्याचे काम दिले गेले.
पुढे डेटा एंट्रीसाठी कंत्राटी पद्धतीने माणसे घेण्यात आली.

Pune News | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमप्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगतापांसह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल

यावरून आपल्याकडे डेटा मॅनेजमेंट हा किती दुर्लक्षित आहे हे समजून येऊ शकते.
कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांचा हृदयविकार, डायबिटीस किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कोरोनाने झालेले मृत्यू आणि इतर कारणांमुळे झालेले मृत्यू याची नोंद करण्यास आयसीएमआरने देशभरात परवानगी दिली. त्यामुळे त्याचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याने आजही कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या किती आहे हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

corona deaths maharashtra really hidden former cm devendra fadnavis says tell truth

दरम्यान, मुंबईत यासाठी डॉक्टरांची कमिटी तयार केली आहे. त्याद्वारे मृत्यूच्या कागदपत्रांची पाहणी करून तो मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे वर्गीकरण करते.
काही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी रुग्ण अथवा मृत्यू वाढल्याने कारवाईची टांगती तलवार नको म्हणून जाणीवपूर्वक या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी, आपल्यावर अपयशाचा ठपका येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक ही माहिती उशिराने अपडेट करणे सुरू केले.
काहींनी आयसीएमआरच्या नियमांचा गैरफायदाही घेण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री म्हणतात, आकडे लपवू नका!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमी मृत्यूचे आणि कोरोनाबाधितांचे आकडे लपवू नका असे सांगितले होते.
परंतु त्यांच्या सांगण्याकडे काही शहरातल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
दरम्यान, काही जणांनी हे आकडे नंतर अपडेट करा असे सुचवले होते.
त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

फडणवीस म्हणतात, खरे सांगा!

दुसरीकडे आकडेवारीचा विषय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने लावून धरला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना मृत्यूचे आकडे अपडेट करावे लागले.
फडणवीस यांनी आपल्या पत्रात आठ दिवसांत जवळपास १४ हजार मृत्यू अपडेट केले गेले, असे म्हंटले आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | corona deaths maharashtra really hidden former cm devendra fadnavis says tell truth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update