Devendra Fadnavis : ‘राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती चिंताजनक, युवकांचे देखील बळी जातायंत’

पोलीसनामा ऑनलाइन – वसई पूर्व भागात उसगाव येथे सुरु केलेले श्रमजीवी कोविड सेंटरचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. बाधितांची संख्या वाढत आहे मृत्यूही होत आहेत. कोरोनाची ही लाट भयंकर असून, सर्व वयोगटातील व्यक्तींना याची लागण होत आहे या संक्रमणामुळे आपली आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत आहे असे फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले. यावेळी त्यांनी कठीण परिस्थितीत रुग्णांचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, नर्स यांचे आभार मानले.

याप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, विवेक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजन साठा केंद्र सरकारने दिला असून, रेमडेसिविर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. पण, या दिलेल्या बाबींचे नियोजनपूर्ण वाटप करणे महत्त्वाचे आहे. पालघर हा आदिवासींचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनाथांसारखी वागणूक न देता रुग्णसंख्येप्रमाणे ऑक्सिजन व रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून द्यायला हवा.

उसगाव येथे १०० खाटांचे सुरू केलेले श्रमजीवी हे पहिले कोविड सेंटर असून, यात २० ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आहे. या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर वसई, विरार, नालासोपारा किंवा विक्रमगड या ठिकाणी जावे लागते. मात्र निसर्गाच्या सान्निध्यात उभारलेल्या या कोविड सेंटरमुळे येथील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

READ ALSO

Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची मुसंडी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर

पंढरपूर पोटनिवडणूक : ट्रेंड बदलला ! भाजपच्या समाधान आवताडेंनी घेतली मोठी आघाडी

IMP NEWS – Gold Price Today : आठवडाभरात 3400 रुपयांनी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या पुढे आणखी स्वस्त होईल की, येईल तेजी…?