पालकमंत्रीपदाचे अन् बंगल्या-दालनाचे वाद संपल्यानंतर ठाकरे सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकाराला शेतकरी प्रश्नावर घेरण्याची मालिका कायम आहे. राज्यात नव्याने आलेल्या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, मात्र नेत्यांमध्ये सत्तेसाठी सुरु असलेला वाद संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या भांडण संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांंसाठी वेळ मिळणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.

यावेळी टीका करताना फडणवीस म्हणाले की राज्यात नवे सरकार आले परंतु या सरकारला शेतकरी, शेती, कारखानदारी, सहकार, फळबाग याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या भांडणामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळणार नाही.

फडणवीस म्हणाले की सध्या सरकारमध्ये असलेले नेते बंगले, दालनं, पालकमंत्रीपद यावरुन भांडत असून, हे सर्व वाद पुढील सहा आठ महिन्यात जर मिटली तर त्यानंतर सरकारमध्ये असलेले नेते शेतकऱ्यांकडे वळून पाहतील. तोपर्यंत तरी ते शेतकऱ्यांकडे लक्ष देतील असे वाटत नाही.

फेसबुक पेज लाईक करा –