Devendra Fadnavis | ‘मागच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता’, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर सडकून टीका (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी आज घेण्यात आली. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मागील अडीच वर्षे सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोणतेही निर्णय घेत नव्हते. यापूर्वीच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता. त्यामुळेच निर्णय होत नव्हते अशी टीका फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर केली.

 

 

 

यावेळी महसूलमंत्री (Revenue Minister) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil), खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande), ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Senior Leader Madhukar Pichad) यांच्यासह मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मागील अडीच वर्षे सत्तेत असलेले मविआचे सरकार कोणतेही निर्णय घेत नव्हते. आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसापासून निर्णय घेण्यास सुरुवात झाली. हे सर्व निर्णय सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून घेण्यात आले. शेतकरी सुखी झाला पाहिजे हाच आमचा उद्देश असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, निळवंडे प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे प्रचंड पाणी आले. त्यामुळे सर्वांना समाधान लाभले आहे. हा प्रकल्प माझ्याही जन्माच्या आगोदरचा आहे. त्यावेळी आठ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प पाच हजार कोटींच्या पुढे गेला. मात्र 1995 साली युतीचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. त्यानंतर 2003 ते 2017 या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यताच नव्हती. त्यामुळे पकल्पासाठी पैसे खर्च करता येत नव्हते. मात्र 14 वर्षानंतर म्हणजे 2017 साली या प्रकल्पाला पहिल्यांदा अडीच हजार कोटी मिळाले आणि प्रशासकीय मान्यताही मिळाली. त्यानंतर या कामाला गती आली. या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण मंत्रालयात यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर या प्रकल्पाला वेग आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

 

Advt.

आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत.
पण मध्यंतरीच्या काळात आपण असे सरकार पाहिले की, ज्यांना निर्णय लकवा होता.
निर्णयच घेयचा नाही हा त्यांचा निर्णय होता. पण आता रोज निर्णय होत आहेत. हिताचे निर्णय घेतले जात आहेत.
कागदावरचे नाही तर जमिनीवर ते निर्णय दिसत आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना टोला लगावला.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | criticizes the opposition, ‘the previous government was paralyzed in decision making’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा