Devendra Fadnavis | ‘सावरकर बनण्याची तुमची औकात नाही’, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर घणाघाती टीका (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या जीवनावर लिहलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन शनिवारी नागपूर येथे करण्यात आले. शुभांगी भडभडे (Shubhangi Bhabhade) लिखीत या पुस्तक प्रकाश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना लक्ष्य केलं. सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजेत. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतोय, असं वाटतं, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा सावरकर यांचे विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते.

सावरकर बनण्याची औकात नाही

राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असं म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत मला म्हणायची इच्छा होते. सावरकर बनण्याची तुमची औकातही नाही. औकात शब्द ज्यावेळी वापरला जातो त्यावेळी राज्यात त्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो. पण नागपुरात औकात म्हणजे क्षमता असा याचा अर्थ आहे. त्यामुळे सावरकर बनण्याची तुमची औकात नाही म्हणजे क्षमता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

राहुल गांधींना याचा अंदाज येऊच शकत नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले. पण, सावरकर अंदमानच्या तुरुंगातील (Andaman Jail) छोट्याशा खोलीत राहत आणि त्यांना खाण्यास किळसवाण्या गोष्टी मिळत. तसेच, कोल्हूचा बैल म्हणून दिवसभर श्रम केल्यावर ज्या व्यक्तीला महाकाव्य सुचते, अशा व्यक्तीचा अंदाज राहुल गांधींना येऊच शकत नाही. राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला.

काँग्रेसनं नाकारण्याचं काम केलं

‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द सावरकरांनी दिले आहेत.
त्यामुळे एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगलं स्वीकारण्याचा आग्रह धरणारा
तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडे पाहिलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोहचवावं लागेल.
कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar),
नेताजी बोस (Netaji Bose) यांना नाकारण्याचं काम केलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | dcm devendra fadnavis attacks rahul gandhi over veer sarvarkar comment in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा