Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची सनातन धर्मावर बोलणाऱ्यांवर जहरी टीका; म्हणाले – ‘यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही…’ (व्हिडिओ)

मध्य प्रदेश : आगामी लोकसभा 2024 च्या निवडणूकीचे (Lok Sabha Elections 2024) बिगुल वाजले आहे. एनडीए आघाडी (NDA Alliance) आणि इंडिया आघाडी (India Alliance) हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून राजकीय वाद सध्या दिसून येत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे आणि बैठका देखील वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील मध्य प्रदेशमध्ये ‘जन आशिर्वाद यात्रे’मध्ये सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सनातन धर्मावर टीका करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंडिया आघाडी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देखील खोचक टीका केली आहे.
मागील काही दिवसांपासून सनातन धर्माचा मुद्दा देशभर केंद्रस्थानी आला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister M. K. Stalin) यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केलं. मलेरिया, डेंग्यू, कोरोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानानंतर अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आणि सनातन धर्मांचा मुद्दा पुढे आला. दरम्यान, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्मावर बोलणाऱ्या लोकांना खडेबोल सुनावले आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोललं नाही पाहिजे. पण तुम्ही इतर धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशाप्रकारे बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष माननं, यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.” अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी इंडिया आघाडी व राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1703652143490584974?s=20
इंडिया आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “इंडिया आघाडीमध्ये कोणीही एकमेकांना नेता मानण्यास तयार नाही. या आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्यापेक्षा दुप्पट नेते आहेत.
त्यामुळे अशा प्रकारची आघाडी कधी कामी नाही येत. या आघाडीतील पक्षाचे बोलणे हे एकमेकांच्या विरोधातील आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे या आघाडीतील पक्षांचे एकमेकांच्या राज्यांमध्ये काही अस्तित्व देखील नाहीये.
त्यामुळे असे पक्ष एकत्रित जरी आले तरी काही परिणाम करु शकणार नाहीत.
ममतादीदी युपीमध्ये जाऊन प्रभाव नाही टाकू शकत आणि अखिलेशजी बंगालमध्ये काही प्रभावी नाही ठरु शकत.”
अशा कडक शब्दांत फडणवीसांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
तसेच त्यांनी राहुल गांधी यांना खोचक टोला देखील लगावला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधी सकाळी काय बोलतात हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही.
आणि संध्याकाळी काय बोलतात हे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी आठवत नाही.
राहुल गांधी हे काँग्रेससाठी महत्वाचे नेते असले तरी देखील त्यांचे वक्तव्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.”
अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune NCP News | राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन! अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची बाईक रॅली