Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (सोमवारी) नांदेडमधील (Nanded) कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुक (Deglur by-election) प्रचार दरम्यान आले होते. त्यावेळी प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार 2 वर्षांपासून विकास नव्हे फक्त भ्रष्ट्राचार करत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील, अशा शब्दात फडणवीस यांनी टिका केलीय.

त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं.
मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळाली. राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळते.
या सरकारने दोन वर्षात राज्यात केवळ भष्ट्राचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून 10 लाख लोकांना घरं दिली.
गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे.
आयकर खात्याच्या धाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोट-निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ कुंडलवाडी, बिलोली आणि देगलूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा होणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) ही उपस्थित राहाणार होते.
आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाई हा भाजपचा प्रमुख मुद्दा असल्याचं पोटनिवडणुकीतील प्रचारावरुन दिसतेय.
याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (सोमवारी) महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.

हे देखील वाचा

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Devendra Fadnavis | deglur bypoll election bjp leader devendra fadnavis criticism thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update