फडणवीसांनी केला ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा ‘हल्लाबोल’, केल्या ‘या’ 5 महत्त्वाच्या मागण्या

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘ निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली 100 कोटींची मदत अतिशय तोकडी आहे, त्यामुळे सरकारने तातडीने आणखी मदत जाहीर करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. तसेच मागील वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरावेळी त्यांनी ज्या प्रकारची मदत केली तेवढीच मदत केली जावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, महापुरात झालेल्या नुकसानासाठी कोल्हापूरला 4800 कोटींचे आणि परिसरासाठी 2105 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. असे एकून 6800 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं.

‘गेल्या वर्षी आलेल्या महापूरात जे नुकसान झालं, त्यावेळी आम्ही काही निर्णय घेतले होते, त्याच प्रकारचे निर्णय या सरकारनेही घ्यावेत, अशी आमची मागणी नाही. परंतु ठाकरे सरकारने पुरेशी मदत करावी. असे म्हणत फडणवीस यांनी काही मागण्या ठाकरे सरकारकडे केल्या.

   महापुरावेळी ग्रामीण भागातील पीडितांना 10 हजार आणि शहरी भागात पीडितांना 15 हजार रुपये रोख पैसे देण्यात आले होते, आताच्या सरकारने अशाच पद्धतीची मदत केली पाहिजे.

–   15 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांसाठी दुहेरी मदत करण्यात यावी.

   घरांच्या दुरुस्तीसाठी , जनावरांच्या गोठ्यांसाठी टपरी, छोटी दुकानं यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे.

–   एनडीआरएफच्या निकषाने आपण नुकसान भरपाई करतो, आणि त्यानंतर आपण दिलेली रक्कम केंद्र सरकार आपल्याला परत करते. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत करण्यात आली होती. आज ज्याप्रकारे नुकसान झाले आहे, तिथेही अशाच प्रकारे एनडीआरएफच्या निकषांपलिकडे जाऊन मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

   यासोबतच कोरोनाची परिस्थितीवरूनही फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, केवळ महाराष्ट्रातच 35 हजार सॅम्पल टेस्ट करू शकतो, मात्र सध्या केवळ 15 हजार टेस्ट करत आहोत. आज देशात दररोज तीन लाख PPE किट तयार होत आहेत. मुंबईत केवळ २७ टक्के चाचण्या होत आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे.

   महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे चीन मधून बाहेर पडणारे उद्योग – धंदे भारतात येतील, त्यामुळे आपल्या राज्यातही अनेक उद्योग येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सरकारने तयार असले पाहिजे.