Devendra Fadnavis | नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे, देवंद्र फणवीसांचे एका दगडात दोन पक्षी (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सतत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका करत आहेत. त्यांवर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाना पटोलेंसह (Nana Patole) विरोधकांवर टीका केली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे असून आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही अशी टीका फडणवीस यांनी केली. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) भाजपमध्ये (BJP) समन्वय असून आमच्यात कोणतीही अडचण नाही. गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी 22 जागांवर दावा केला नसून आमच्या युतीत कोणतेही मतभेद नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारत असताना त्यांनी कोण संजय राऊत? असं म्हणत टीका केली.

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1661999159313043458?s=20

 

एका दगडात दोन पक्षी

युतीत कोणतेही वाद नसून जरी असले तरी चहाच्या कपाएवढे आणि ते शमले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काहीही झालं तरी त्याचं खापर भाजपवर फोडलं जातं, इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्याला आमचा हात आहे असं म्हणू नये म्हणजे झालं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी महसूल मंत्री (Revenue Minister) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि
भाजप आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde) यांच्यामधील वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,
दोघांमधील वाद एका पेल्यातील वाद आहे. तो आता थांबलेला आहे. तो किरकोळ वाद होता.
मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे. त्यामुळे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे,
असे सांगत त्यांनी दोघांमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Web Title :  Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis along with sanjay raut and nana patole criticized maha vikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले