Devendra Fadnavis | ‘… त्यावेळी बदला घेण्यासाठी जिवंत रहावं लागतं’, पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीपासून (swearing-in Ceremony) ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde Government) उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आजच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) हेच आहेत, असा टोला लगावला. शिवसेना फोडण्यामागे भाजप (BJP) किंवा इतर दुसरा कोणी नसून उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

यावेळी त्यांना अजित पवार यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथविधी सोहळ्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी ती चूक झाल्याचं मान्य केलं. तसेच राजकारणात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात कारण जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुसपलं जातं त्यावेळी बदला घेण्यासाठी तुम्हाला जीवंत राहावं लागतं, असं म्हणत अजित पवारांसोबत झालेल्या त्या शपथविधीबद्दल आपली भूमिका व्यक्त केली.

आजच्या परिस्थितीचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना
जे लोक आमच्या सोबत आले त्यांना वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो.
त्यामुळे सर्वजण आमच्यासोबत आले. चाणक्य (Chanakya) वगैरे सोडा.
पण या परिवर्तनासाठी कोण जबाबदार आहे? असा प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन उद्धव ठाकरे.
त्याचं क्रेडीट त्यांनाच जाईल. कारण त्यांनी आमच्या सोबत युती तोडली (Alliance) नसती, पोकळ सरकार स्थापन केलं नसतं, ते चालवलं नसतं तर आज जे काही घडलं ते घडलंच नसतं. त्यामुळे आजच्या परिस्थितीला खरे जबाबदार हे उद्धव ठाकेर हेच आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis made a big statement about the swearing in ceremony with ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या