Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेकलेली (Ink Throwing) घटना अत्यंत दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यांचा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागीतली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

 

महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jotiba Phul), कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र आज पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. आता या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे.
महापुरुषांच्या कामाबद्दल बोलताना त्यांच्या मनाचा मोठेपणा किती होता हे चंद्रकांत पाटील यांना सांगायचं होतं.
परंतु, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. तसेच त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागीतली आहे.
तरी देखील त्यांच्यावर शाईफेक हल्ला करण्यात आला. हे चुकीचं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमधील काही वाक्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी सर्वच नेत्यांना एक सल्ला दिला दिला आहे. सर्वांनीच बोलताना भान ठेवले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnavis reaction on chandrakant patil ink throwing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई