Devendra Fadnavis | ‘मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट सीपी संजय पांडेंना दिलं होतं’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) काळात मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांना दिले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसचे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

त्यांच्याशी कोणतंही वैर नाही

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, माझं आजही त्यांच्याशी कोणतंही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. मात्र पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणं योग्य समजलं नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असं टार्गेटच तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट त्यंनी केला. उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय वैरामुळे वैयक्तिक मैत्री देखील संपुष्टात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला.

उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर

आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो तुम्ही मोदींचा (PM Narendra Modi) लावा बघू लोक कोणाच्या पाठीशी उभं राहतात, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्हाला चॅलेंज द्यायचं राहू द्यात. आधी तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलात ना? 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) बॅनरवर बाळासाहेबांपेक्षाही मोदींचा मोठा फोटो तुम्हीच छापून निवडून आला होता. बाळासाहेब आजही आमचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केले

राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा
मला पदमुक्त करा असे म्हणाले होते असे त्यांनी सांगितले.
तर भाजप-शिवसेना युती आणि शिवसेनेतील बंडाबाबत बोलताना मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केलेत,
असंही फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांच्या नेतृत्वातील आमच्या महाराष्ट्र सरकारनं भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याची पायाभरणी करण्याचं
काम सुरु केलं असल्याचे सांगितले. नागपूर-मुंबई समृद्धी एक्सप्रेस महामार्ग
(Nagpur-Mumbai Samruddhi Express Highway) हा केवळ एक रस्ता नसून इकोनॉमिक कॉरिडोअर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis on maharashtra political crisis shivsena bjp cm eknath shinde uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?