Devendra Fadnavis | ब्राह्मण समाज काही मागत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असे म्हणत ब्राह्मण समाज (Brahmin Community) काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. तसेच ब्राह्मण मंडळी समाजात गोडवा निर्माण करतात असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. कसबा पेठ पोटनिवडणुकीला एक दिवस बाकी असताना फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे कसब्यातील (Pune Kasba Peth Bypoll Election) ब्राह्मण मतांवर परिणाम होईल का हे बघावे लागेल.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, मी अनेक कार्य़क्रमांमध्ये सहभागी होत असतो. अनेक संघटना काम करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये ब्राह्मण संघटनेत (Brahmin Organization) अधिक काम होत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही संघटना कोणतीच मागणी करत नसल्याचे ते म्हणाले.

ब्राह्मण समाजाने नेहमीच समजाला देण्याचे काम केले आहे. आम्ही केवळ देण्याचे काम करतो. ही जी देण्याची परंपरा कायम ठेवत मागण्याऐवजी देणारे कसे बनावे याबाबत येणाऱ्या पिढिला तयार केले पाहिजे. हीच ब्रह्मोद्योगची अपेक्षा असून याच दृष्टीने याची सुरुवात करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, देशाच्या लोकसंखेच्या तुलनेत ब्राह्मण कमी असतील.
परंतु त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, समाजरूपी दूधात ब्राह्मणाला मिसळल्यास ते साखरेच्या गोडव्याप्रमाणे
काम करतात, असे मी नेहमी सांगतो, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadanvis during pune kasba by election big comment on brahmin community

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ayushmann Khurrana | बॉलीवूडबाबत अभिनेता आयुष्मान खुरानाने केले मोठे वक्तव्य; म्हणाला “बॉलीवूड मध्ये टॅलेंट…”

Pune Kasba Peth Bypoll Election | हा तर पॉलिटिकल स्टंट, रविंद्र धंगेकरांच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)