Devendra Fadnavis | पोलीस महासंचालकांना हाताशी धरुन रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुंभाड रचलं, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल (व्हिडिओ)

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्या विरोधात पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) दाखल करण्यात आलेला तपास बंद करण्यात येत आहे. तसा क्लोजर रिपोर्ट (Closure Report) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुबईत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेद करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना रश्मी शुक्ला यांचाबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. मागच्या सरकारने तत्कालीन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना हाताशी धरुन रश्मी शुक्ला आणि अनेक अधिकाऱ्यांविरोधात कुंभाड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

 

फडणवीस पुढे म्हणाले, पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर अन्याय करणार नाही. अथवा कोणत्याही अधिकाऱ्यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?
रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार (Telegraph Act) गुन्हा दाखल आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी याबाबत आरोप केले होते.
राज्य गुप्त वार्ता विभागात आयुक्त (State Intelligence Commissioner) असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
याच समितीने राज्य शासनाला (State Government) अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis allegation mahavikas aghadi government over rashmi shukla phone tapping case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना