Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. अखेर आज दुपारी सत्ता स्थापनेचा दावा केला असून मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी केली. याबाबत घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. राज्याला एक धक्कातंत्र देणारी घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेच्या भुवय्या उंचावल्या. यावेळी बोलताना मी मंत्रिमंडळातून बाहेर असणार असं देखील फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी (J. P. Nadda) मोठं विधान केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा घ्यावा,’ असं भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक विनंती केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असं केंद्रीय नेतृत्वाने म्हटलं आहे,” अशी माहिती अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Devendra Fadnavis as Deputy Chief Minister of Maharashtra BJP national president J. P. Naddas big statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा