Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले- ‘आता शेतीसाठी…’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात उन्याळ्यामध्ये शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यविना पीकं जळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतीसाठीच्या (Agriculture) वीज पुरवठ्याबाबत (Power Supply) मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता शेतीसाठी दिवसा 12 तास अखंडीत वीज देणार असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलं.

 

सोलापूमध्ये भाजप सोलापूर (BJP Solapur) शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. फडणवीस पुढे म्हणाले, आता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास अखंडीत वीज देणार आहोत.

 

 

 

फडणवीस म्हणाले, यातील दुसरं क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर (Solar Feeder) तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन 30 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ, असं त्यांनी जाहीर केलं.

 

म्हणून ते एकत्र येत आहेत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केलं. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो तो गेल्या नऊ वर्षात मोदींनी दाखवून दिला आहे. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

 

मोदींवर काहीही परिणाम होणार नाही

विरोधक कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही.
त्यांनी 2019 मध्येही हे करुन पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करुन पाहिलं.
मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो
की विधानसभा असो भाजपलाच पाठिंबा मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

 

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis big announcement about electricity for farming

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा