Devendra Fadnavis | ‘थोडा अधिकचा सल्ला नाना पटोलेंनाही द्यावा’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सल्ला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली आहे. अशातच दोन्ही गटांनी दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेण्याची घोषणा करत जोरदार तयारी सुरु केली आहे. दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले होणार असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी दोन्ही गटांना टीका करताना मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. याबैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पत्रकारांशी बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, शरद पवार सल्ला देत आहेत हे चांगलं आहे. त्यांनी असे सल्ले देत राहिले पाहिजे. त्यांनी त्यांच्या लोकांनाही असे सल्ले द्यावेत. थोडा अधिकचा सल्ला त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांनाही द्यावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

सर्वाधिक निर्णय भाजपच्या (BJP) मंत्र्यांनी घेतले या टीकेला देखील फडणवीसांनी उत्तर दिलं.
हे निर्णय भाजप घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही. हे निर्णय शासन घेतं.
मंत्रिमंडळात निर्णयासाठी (Cabinet Decision) कोणताही विषय येतो,
तेव्हा तो विषय मुख्यमंत्री ठेवत असतात आणि मग त्याला कॅबिनेट मान्यता देतं.
विरोधकांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती, आम्ही निर्णय घेणारे लोक असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं.

 

फडणवीस पुढे म्हणाले, ते फाईलवर बसणारे लोक होते. त्यामुळे सहाजिकच त्यांना त्याचं दु:ख होणारच आहे.
तीच तळमळ थोडी बाहेर येतेय, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis comment on sharad pawar suggestion to thackeray shinde faction over dasra melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त