Devendra Fadanvis | ‘मागचं सरकार फेसबुकवर लाईव्ह होतं अन् जनतेत मृत होतं’; देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाविकास’ सरकारवर हल्लाबोल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक गोष्टींचे उच्चांक पहायला मिळाले. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. अमरावती येथे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी (Devendra Fadanvis) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, ‘सहा महिन्यांपूर्वी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आलं आणि सहा महिन्यांतच सरकार काय असतं? याची जाणीव राज्यातील जनतेला व्हायला लागली. मागचे अडीच वर्ष सरकार बंदिस्त होतं. ते दाराआड होतं. मागचं सरकार फेसबुकवर लाईव्ह होतं आणि जनतेत मृत होतं. त्या सरकारमध्ये केवळ वसुली दिसत होती. अडीच वर्षात वसुलीचे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये गाठलेले आपण बघितले,’ अशी गंभीर टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

तसेच याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मागील सरकारमधील अडीच वर्षात मंत्र्यांपासून सर्वच जेलमध्ये दिसले. वर्क फ्रॉम होम आपण बघितलं होतं. मात्र, वर्क फ्रॉम जेल हा नवीन प्रकार आपल्याला अडीच वर्षात बघायला मिळाला. कारण मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत आणि नैतिकता नव्हती, की जेलमधल्या मंत्र्याचा ते राजीनामा घेतील. शेवटी सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले. तेव्हाच त्यांचा कारभार बंद झाला, अशा प्रकारे अनैतिक सरकार जनादेशाचा विश्वासघात करून आपल्या पाठित खंजीर खूपसून हे सरकार आलं होतं.’

‘दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष विदर्भ, मराठवाडा या मागासवर्गीय भागांवर आपण लक्ष केंद्रीत केलं होतं.
२०१४ पूर्वी अमरावतीतील नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये इंडिया बुल्स ही कंपनी होती.
त्यानंतर आम्ही तिथे टेक्सटाईल पार्क उभं केलं. मोठ्या प्रमाणात उद्योग आणले होते.
मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इतरही उद्योग सुरू
करणार होतात, त्याचं काय झाले? तेव्हा ते मला म्हणाले, अडीच वर्षात आम्हाला जो त्रास झाला.
त्यामुळे आम्ही उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आज आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे.
यापुढे त्यांना कोणताही त्रास होणार नाही.’
असा मिश्किल टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis criticized mahavikas aghadi on minister corruption allegation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yogesh Kadam Accident Case | ‘माझ्या मुलाला गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता’, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Indian Railway New Facility | प्रवाशांसाठी खुशखबर ! जनरल तिकिटावर करू शकता स्लीपर कोचमध्ये प्रवास, लागणार नाही एक्स्ट्रा चार्ज

Chandrashekhar Bawankule | ‘पटोलेंचा दावा म्हणजे उंटावरून…’; भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका