Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पुण्यात भाजपाच्या (BJP) कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले की, शिवसेना (Shivsena) फोडून राज्यात सत्ता स्थापन करण्याचे आमचे काम अडीच वर्षापासून सुरू होते, योग्य वेळेची वाटत पहात होतो. तसेच शिवसेनेतील बंडखोरीनंतर स्वता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीरपणे मान्य केले की ते बंड करण्यापूर्वी रात्री गुपचुप फडणवीसांना भेटत होते. मात्र, पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीला राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राष्ट्रवादी हा व्यावसायिक पक्ष आहे. त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमजोर केले. नंतर तो पक्ष फुटण्यास बाध्य केले आणि रिक्त झालेली जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, हिंदुत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी सातत्याने काम करत असल्याने ती रिक्त जागा भरून काढण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

 

फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निषेध करणार आहेत की नाहीत? भारत जोडो का तोडो यात्रेच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis criticized ncp over shivsena party split

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना