Devendra Fadnavis | वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प आणून विरोधकांना उत्तर देऊ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता प्रकल्प (Vedanta Project) महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारला (State Government) धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नुकतेच तळेगाव येथे आक्रोश आंदोलन केले. वेदांता प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरु असल्याची टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तसेच राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक (Investment) आणू असेही त्यांनी म्हटले. ते माध्यमांशी बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, माझी फायनान्स विभागासोबत (Finance Department) आढावा बैठक झाली. पुढच्या काळात अतिरिक्त साधण संपत्ती करुन मोठी गुंतवणूक कशी आणता येईल, ते आम्ही पाहणार आहोत. जीडीपीच्या(GDP) साडेतीन-चार टक्के गुंतवणूक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट (Capital Investment) म्हणून झाली पाहिजे किंवा एकूण बजेटच्या 25 टक्क्यापर्यंत कशी नेता येईल, त्याबद्दल विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

प्रसार माध्यांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांवर टिकास्त्र सोडले. वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरु आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांता कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला सजमलं होते की, ते गुजरातला (Gujarat) जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र लिहिली. स्वत: जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज देऊ, चांगली जागा देऊ, असेही सांगितले होते. मात्र, त्यांचा निर्णय आधीच झाला होता. आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नौटंकी करत आहे. पण वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis criticizes opponents over vedanta project says company was already decided to go gujarat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा