मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे काही दिवसांपूर्वी संघ मुख्यालयात गेले होते. तिथे त्यांनी संघ प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतरच त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्यामुळे दाल में कुछ काला है असे म्हणत नाना पटोले (Nana Patole) यांनी आरोप केले होते. पटोले यांच्या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मला वाटतं की नाना पटोलेंच्या अशा वक्तव्यावर मी कधीच काही म्हणत नाही. कारण उत्तर काय देणार? मी असं म्हणू का की नाना पटोलेंनी लादेनची भेट घेतली होती. तसं म्हणणं जसं मूर्खपणाचं ठरेल तसंच नाना पटोलेंचं हे वक्तव्य आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हा विषय संपवला.
🕓 3.55pm | 22-05-2023📍Mumbai | दु. ३.५५वा. | २२-०५-२०२३, 📍मुंबई.
LIVE | Media interaction#Mumbai https://t.co/ORfdqYd5Zp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2023
काय म्हणाले नाना पटोले?
समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीत (CBI Inquiry) काहीतरी काळंबेरं आहे. दाल में कुछ काला है.
त्यांच्याकडे भाजपा आणि संघाची पोलखोल करु शकतात अशा काही वस्तू आहेत.
वानखेडे हे संघाच्या मुख्यालयात जाऊ संघ प्रमुखांना भेटून आले. त्यानंतर त्यांच्या मागे चौकशी लागली.
भाजपचे राज्यातील नेते म्हणत होते की वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही पाहून घेऊ.
सीबीआय आणि ईडी (ED) ही केंद्र सरकारची दोन माकडे आहेत. त्यापैकी सीबीआय वानखेडेंची चौकशी करत आहे.
आता भाजपचे लोक कुठे गेले, असा सवाल नाना पटोलेंनी केला होता.
समीर वानखेडेंबाबत असं काय घडलं की, मोहन भागवतांना (Mohan Bhagwat) भेटल्यानंतर चौकशीचा
ससेमिरा मागे लागला. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
काही गोष्टी संशयास्पद आहेत, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. मात्र, नाना पटोले मूर्खासारखी वक्तव्य करत
आहेत त्याला काय उत्तर देणार? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खिल्ली उडवली.
Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis gave answer to nana patole about his allegations on sameer wankhede and rss
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sanjay Shirsat | …तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते, संजय शिरसाट यांचे खळबळजनक विधान