Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

 

आमच्या पेक्षा जास्त काळ केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षांचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी तो प्रश्न का सोडवला नाही? त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमाप्रश्नावर बोलताना प्रत्येकाने विचार करुन बोलले पाहिजे. कर्नाटकात आणि महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे आपण पाहिली आहेत. सर्व सरकारे एकाच भूमिकेची होती. आजपर्यंत महाराष्ट्रात पक्षाचा वाद सीमाप्रश्नात आपण आणला नाही. आताही कोणी राजकारण करु नये. त्यामुळे सीमाप्रश्नाचा वाद खिळखिळा होईल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

 

भाजप खासदार उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्यामुळे शरद पवारांना जाग आली. आपल्यासमोर घटना घडली आणि आपण काहीच बोललो नाही,
हे त्यांना उशिरा कळाले. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. त्यातून उद्धव ठाकरे बोलत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताला आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणी वाद करु नये, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis mocks uddhav thackeray on maharashtra karnataka border issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास