
Devendra Fadnavis | ‘काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मला त्यांना एवढंच सांगायचंय…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात होळीचा सण (Holi Festival) उत्साहात साजरा होत आहे. आज धुलीवंदन (Dhulivandan) असून यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळी देखील धुळवडीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांना रंग लावून राजकीय नेते मंडळी धुलिवंदन साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर रंगांप्रमाणे काही ठिकाणी राजकीय रंग उधळले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत भाजप (BJP) कार्यालयात धुलिवंदन साजरे केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत विरोधकांवर राजकीय फटकेबाजी केली.
अर्थसंकल्प वेगवेगळ्या रंगात रंगलेला असेल
यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अर्थसंकल्पाबाबत (Budget) विचारणा केली असता तो सर्वच घटकांचा असेल, असे ते म्हणाले. ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेला असेल. सगळ्यांना त्याचे रंग बघायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल.
आता आमचा बदला हा आहे की…
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांचा बदला घेण्यासंदर्भातील आपल्या विधानाचा संदर्भ देत विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही विधानसभेत सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात या कुणाबद्दल कोणतीही कटुता नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/exUzWusEjl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2023
संगिताचा, कामाचा नशा करावा
यावेळी त्यांनी भांग पिण्यापेक्षा भांग पिणाऱ्यासोबत बसण्यात मजा असते असे वक्तव्य केले. यावर पत्रकारांनी तुम्हाला कोणते प्रसंग आठवले असा प्रश्न विचारला. त्यावर हसून फडणवीस म्हणाले, अनेक वेळा होळीला आमच्या काही मित्रांना खोटं सांगून, भांग वगैरे पाजली. त्यानंतर दिवसभर त्यांचे जे काही चाललं होतं, कुणी गाणं गात होतं, कुणी रडत होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा, कामाचा नशा करावा, असे सांगितले.
काही लोक 365 दिवस शिमगा करतात
आज मला राजकारणावर बोलायचं नाही. मला फक्त एक -दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की,
उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे देखील शिमगा करण्याची पद्धत आहे.
पण काही लोक 365 दिवस शिमगा करतात. मला त्यांना एवढंच सांगायचंय की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.
LIVE | From ‘Rang Barse’, Mumbai.#Holi #Holi2023 #HappyHoli #Dhulivandan https://t.co/rjcMIjREzq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2023
Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis mocks udhav thackeray group ncp congress on holi celebration
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा, संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान