Devendra Fadnavis | ‘…तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडी कार्यालयात चौकशी (Jayant Patil ED Inquiry) सुरु आहे. आयएल अँड एफएस गैरव्यवहार प्रकरणी ( IL&FS Case) जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. आयएल अँड एफएस कडून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी पाटील यांची चौकशी सुरु आहे. भाजपने (BJP) त्यांच्यामागे चौकशी लावल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. जयंत पाटील यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नसल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजप यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, मुळात केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचं काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादं प्रकरण असेल म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं असेल. जर पाटील यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नसल्याचे फडणवीस म्हणाले.

काय आहे प्रकरण?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरु होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती.
या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.
यापूर्वीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरेंना (Raj Thackeray) नोटीस पाठवण्यात आली होती.
आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग (Money Laundering) झालं आणि पोलिसांनी यात
गुन्हा (FIR) दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा (Arun Kumar Saha) यांना ताब्यात घेऊन
चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis on jayant patils ed inquiry il and fs malfeasance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘…तर नाना पटोले लादेनला भेटले होते’, पटोलेंच्या ‘त्या’ आरोपींवर फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Sameer Wankhede | समीर वानखेडेंना उच्चन्यायालयाचा दिलासा, ‘या’ दोन अटींवर अटक न करण्याचे CBI ला निर्देश

Maharashtra Politics News | ‘…त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे, बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल