Devendra Fadnavis | ‘भीमा कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा’, प्रकाश आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; देवेंद्र फडणवीस म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ (Bhima-Koregaon Case) येथे 2018 मध्ये दंगल झाली होती. याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आयोगाकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चौकशीसाठी बोलवावं अशी मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘किलबिलाट’ या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात पंप स्टोरेजच्या (Pump Storage) संदर्भात आज 13 हजार 500 मेगावॅटचे करार करण्यात आले. याची माहिती देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीवर भाष्य केलं.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1666001934480982016?s=20
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
आयोगाने (Bhima-Koregaon Commission) मला बोलवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना चौकशीसाठी बोलवावे. तसेच, 2018 साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मलिक (Sumit Malik)
आणि ग्रामीण पोलिसचे (Pune Rural Police) तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक
(Former SP Suvez Haque ) यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
प्रकाश आंबेडकर निष्णात वकील
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज
केले आहेत. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे,
आयोगासमोर कोणाला बोलववं आणि कोणास बोलवू नये. पण, राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि
लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis on prakash ambedkar asks koregaon bhima probe panel to summon maharashtra dy cm fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Kashish Social Foundation | कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने 25 हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप