Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ (Lalbaugcha Raja) मंडळात एकानंतर एक वाद होताना पहायला मिळत आहे. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना (journalist) पोलिसांनी (Mumbai Police) आरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. पोलीस निरीक्षक संजय निकम (Police Inspector Sanjay Nikam) यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे.

माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही.
अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

लालबागचा राजाच्या दरबारात वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे आरेरावी केली.
अधिकृत पास (Authorized pass) असतानाही निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले.
मीडियाकर्मींनी निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यास सांगितले.
त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढल्याचे दिसून आले.
या प्रकारावरुन फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माध्यमं आपलं काम करत होते.
जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे.
मागील दोन वर्षांपासून असे प्रकार सुरु आहेत. इतकी दंडुकेशाही योग्य नाही.
याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे पण अशा प्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या (law and order) गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही.
अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे.
अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

हात काय, पाय पण लावेन…

पोलीस निरीक्षक संजय निकम स्वत: तर मास्क घातला नव्हता.
आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडले नाही.
उलट त्याला धक्काबुक्की केली.
तसेच पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ‘हात काय, पाय पण लावेन’,
अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या पत्रकारासह इतर पत्रकारांना देखील बॅरेकेडच्या बाहेर काढण्यात आले.
यावेळी निकम यांनी अरेरावीची भाषा कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओ पाहून कारवाई करणार

दरम्यान, या ठिकाणी आलेल्या पोलिस उपायुक्तांना (DCP) यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला.
त्यावर त्यांनी व्हिडिओ पाहिला नाही, तो पाहून कारवाई करु असे सांगितले.
पोलिसांच्या या वर्तनामुळे आता राज्याच्या गृह खात्यावर (Home Department) प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis protests against police arrears on media fadnavis alleges pressure on media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक