Devendra Fadnavis | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणार’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सध्या सीमावर्ती भागांतील गावांवरुन वाद सुरु आहे. हा वाद आजचा नाही. पण तो पुन्हा एकदा वर आल्याने राज्याचे सर्व राजकारणी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मागे लागले आहेत. याची सुरुवात मात्र कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यावर कर्नाटकाने दावा केल्याने या वादाला सुरुवात झाली. वास्तविक या गांवांनी पाणी टंचाईला कंटाळून कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता.. परंतु त्यांचा हा दावा महाराष्ट्राने फेटाळून लावला आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

 

कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र राज्य शासनाची 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील एकही गाव राज्याच्या बाहेर जाणार नाही. आम्ही आमचे मराठी भाषिक प्रदेश परत मिळवू. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी केली आहे. मागील काळात काँग्रेसचे सरकार होते. त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. आम्ही हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु. सीमा प्रश्नावर कोणीही राजकारण करु नये, असे यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. आमचे मराठी भाषिक प्रांत आम्हाला मिळतील, असा विश्वास देखील यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

आज (दि. 24) पुन्हा एकदा सीमाप्रश्नावरुन बोम्मई यांनी महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राला आमचा भाग देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.
ते गेली अनेक वर्षे या भागांसाठी लढत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही. मिळणार नाही.
उलट आम्हाला सोलापूर आणि अक्कलकोटमधील कन्नड भाषिक प्रांत महाराष्ट्राने द्यावा,
असे बसवराज बोम्मई म्हणाले होते. त्यामुळे राजकारण तापले होते.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on maharashtra karnataka border dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’