Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंड (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी युतीची (Alliance) घोषणा केली. या दोन पक्षांच्या युतीनंतर राज्यातील समिकरणे बदलतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या युतीचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल असा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

केवळ भाजपला विरोध म्हणून युती

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, या युतीने फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना यांच्या विचारांमध्ये बरेच अंतर आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार (Naming of Marathwada University) करुन त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव द्यायचे होते, त्यावेळी भाजपने (BJP) पाठिंबा दिला तर शिवसेनेने याला विरोध केला होता, असे फडणवीस म्हणाले.

मंडल आयोग आला तेव्हा शिवसेनेनं विरोध केला

मंडल आयोग (Mandal Commission) आला त्यावेळी भाजपने आरक्षणाचे (Reservation) समर्थन केले, मात्र शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारचे आरक्षण रद्द करुन ते आर्थिक निकषांवर करावं अशाप्रकारची शिवसेनेची सातत्याने मागणी राहिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरपीआय (RPI) आणि प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका आहे त्याच्याविरुद्ध शिवसेनेची भूमिका असल्याचे मत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं.

हे पक्ष कुठल्याही प्रकारची तजडोड करायला तयार आहेत

अशा नामविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेनेबरोबर प्रकाश आंबेडकर यांना जावं लागतं.
याचा अर्थ भाजपला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहेत,
असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

त्यांना माहिती नाही, हिंदुत्ववादी मतदारांनी…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मला वाटतं जनतेला हे समजतं.
प्रकाश आंबेडकर हे सतत अकोल्यातून निवडणूक लढले मात्र ते जिंकून आले नाहीत.
आता त्यांना असे वाटते की शिवसेना बरोबर आली तर हिंदुत्ववादी मतं (Hindutva) आपल्याला मिळतील.
परंतु त्यांना माहिती नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ कधीच सोडली आहे.
कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडले. त्यामुळे हिंदुत्वादी मतं शिवसेनेसोबत कशी राहतील?
त्यामुळे या युतीचा फार परिणाम होणार नाही. आता युती केलीच आहे तर निवडणुकीत काय परिणाम होतो पाहुयात,
असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on shivsena uddhav thackeray vba prakash ambedkar alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?