Devendra Fadnavis | मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी फडणवीसांचे सूचक विधान, म्हणाले- ‘लवकरच…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात (Sandeep Deshpande Attack Case) आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या प्रकराणातील सत्य लवकरच बाहेर येईल असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते अमरावतीत बोलत होते.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर (Shivtirtha) मॉर्निंग वॉकला गेले असता हल्ला करण्यात आला. यामध्ये देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली आहे. देशपांडे यांनीही आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे.

भाजपचे सरकार (BJP Government) हे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पत्र नऊ राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लिहिले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावले आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे. न्याय मिळत नसेल तर न्यायालय आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी यंत्रणांचा असा गैरवापर झाला असल्यास ते उदाहरण दाखवावे, असे फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षातून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची चौकशी बंद केली जाते, यावर विरोधी पक्षांने नाव सांगावे.
कुणाचीही चौकशी बंद झाली नाही. भाजपमध्ये असाल किंवा कुठेही असाल, चौकशी काही बंद होत नाही,
असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Web Title :-  Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction to the sandeep deshpande attack case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी