
Devendra Fadnavis | सभागृहात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी, मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) गुरुवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु असताना अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुगलबंदी बघायला मिळाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) महिलांना प्राधान्य द्यावे अशी सूचना केली. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं.
महिलांना मंत्रिमंडळात स्थान द्या
राज्य पुढे नेत असताना माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना स्थान द्यावे. यामुळे इतर आमदार सोडून जातील, अशी भीती तुम्हाला असले तर, तसं मुळीच होणार नाही, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.
अजित पवारांची सूचना गंभीरपणे घेऊ
महिलांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याच्या सुचनेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी महिला आमदारांना (MLA) मंत्री बनविण्यासंदर्भात ज्या सूचना केल्या. त्या आम्ही अत्यंत गंभीरपणे घेऊ. तसेच येत्या मंत्रिमंडळ विस्तारात अगोदर महिलांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे मंत्रीपदासाठी कोणी कोट शिवून बसलं असलं, तरी महिलांनाच आधी प्राधान्य दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
तुम्ही सोयीच्या टाळ्या ऐकायला लागले आहात
अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत असताना भाजपचे आमदार (BJP MLA) टाळ्या वाजवत नाही.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, तुमच्या काळात तीन पक्ष सत्तेत होते.
राष्ट्रवादीचा (NCP) मंत्री उत्तर देणार असेल, तर सभागृहात केवळ राष्ट्रवादीचे आमदार असायचे.
बाकी दोन पक्षांचे आमदार बाहेर असायचे.
एवढच नाही, तर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी संबंधित पक्षाच्या आमदारांना सभागृहात आणण्याची जबाबदारी त्या-त्या मंत्र्यांवर असायची.
परंतु आमच्याकडे असं नाही आहे. सभागृहात भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार (Shivsena MLA) बसले आहेत.
खरं तर आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या, मात्र, तुम्ही सोयीच्या टाळ्या ऐकायला लागले आहात, असा टोला त्यांनी लगावला.
Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis replied to ajit pawar on cabitnate women minister statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’