Devendra Fadnavis | दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचे सलीम कुत्तासोबतचे (Salim Kutta) फोटो समोर आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एसआयटी स्थापन केली. त्याच दिवशी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचेही असेच फोटो समोर आल्यानंतर मोठे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खडसेंनी (Eknath Khadse) देखील महाजन यांच्यावर आरोप केल्यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाजनांची बाजू जोरदारपणे लावून धरत खडसे यांच्यावर टीका केली तसेच खडसेंनी माफी मागावी अशी मागणी केली.

गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसे यांनी केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप खोटा ठरवत खडसे यांनीच माफी मागावी, अशी उलट मागणी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकमधील मुस्लीम धर्माचे धर्मगुरू ज्यांना शेहरेखातीब म्हणतात, त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला गिरीश महाजन आणि इतर पक्षांतील नेते आणि अधिकारी उपस्थित होते. शेहरेखातीब यांचा दाऊदशी संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले त्यांच्या कुटुंबाचाही दाऊदशी संबंध नाही.

दाऊदशी संबंध असल्याचा गुन्हा शेहरेखतीब यांच्यावर नाही. तेव्हा आरोप झाल्यानंतर तत्कालीन डीसीपीच्या आधारे मी चौकशी समिती नेमली होती. चौकशीनंतर डीसीपीचा अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले की, शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही.

एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
विधानपरिषदेत आल्याने अशाप्रकारचे विषय आज आले असतील. पण, खातरजमा न करता एका मंत्र्यावर आरोप
करण्यात आले. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्ताबरोबर नाचताना का दाखवली नाही? मंत्र्यावर बेछूट
आरोप केल्यावर एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ खडसे
विधानसपरिषदेत एकनाथ खडसे यांनी मागणी केली की, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या
नातेवाईकाच्या लग्नसमारंभात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांसह राजकीय पक्षाचे आमदार, खासदार,
नगरसेवक हजर होते. गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत
चौकशी करावी. सुधाकर बडगुजरांवर तातडीने कारवाई केली. मग, अशा मंत्र्यांनी मंत्रिमंडळात राहणे कितीपत योग्य आहे?
म्हणून सरकारने तातडीने चौकशी करावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Mitkari | खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा भुजबळांचा आरोप, मिटकरी म्हणाले – ‘नागपूरमधील राजे भोसले हे…’

Pune PMC Water Supply News | गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश