Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये फूट पडली. यानंतर तिन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) तयार करुन सरकार स्थापन करण्याची जुळवाजुळव सुरु केली असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथविधी (Swearing in) घेऊन सरकार स्थापन केले. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर तीन वर्षांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटे शपथविधी संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना माहिती होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादीकडून (NCP) ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट (Stable Government) हवंय, म्हणून आपण सरकार तयार करुया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, त्यावेळी त्याचा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नव्हती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्या सोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता, हा लहान होता, असं फडणवीस यांनी सांगितलं.

लज्जास्पद! फडणवीसांनी ‘ती’ पातळी सोडली

देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांविरोधात आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Spokesman Clyde Crasto) यांनी फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे अजिंक्य आहेत असा भाजपचा (BJP) दावा आहे, पण हा दावा पोकळ आहे.
सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांच्या नावाचा गैरवापर करणार्‍या गोपीचंद पडळकरांसारख्या (Gopichand Padalkar) लोकांची पातळी त्यांनी गाठली आहे.
लज्जास्पद!!!’ असे ट्विट करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis slammed by ncp over remarks about sharad pawar related to ajit pawar oath taking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | अनलोडींगच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर खंडणीचा गुन्हा, महाळुंगे MIDC परिसरातील प्रकार

Dream Girl 2 Teaser | बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल 2’ चा टीझर रिलीज

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ ट्वीटने पुन्हा खळबळ; म्हणाले – ‘अब नंबर किस का?’