Devendra Fadnavis | महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनापूर्वीच राजकारण तापलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) पहिले पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) उद्यापासून सुरु होत आहे. राज्य सरकारने (State Government) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या टीकांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उल्लेख ‘गजनी’ असा केला.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मला आश्चर्य वाटतं की त्यांनी बेईमानीने आलेलं हे सरकार आहे, असं वक्तव्य केलं जातं. पण मविआचं सरकार बेईमानीचं सरकार होतं. जनमताचा अपमान करुन ते सरकार आलं होतं. त्या सरकारमध्ये 32 दिवस विस्तार झाला नव्हता. त्यांनी आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. कारण नुकतेच ते विरोधात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा बघायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला यावर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

 

राज्यात केवळ 46 दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय. सर्वसामान्यांचे सरकार आल्यासारखं वाटतंय.
इथेही पाय ठेवायला जागा नाही. नाहीतर मंत्रालय रिकामं होतं, सह्याद्री रिकामं होतं, मंत्र्यांची बंगले रिकामे होते.
आता कुठेही पाय ठेवायला जागा नाही, असे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारने 9-9 महिने मदत केली नाही,अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis slams maha vikas aghadi and given answer to ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

 

Monsoon Session | उद्धव ठाकरेंची खेळी ! पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांना व्हिप जारी

 

Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार