मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Swatantryaveer Savarkar) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्य विधिमंडळात जोरदार खडाजंगी झाली. त्यापूर्वी सत्ताधारी आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar यांनी सभागृहात संताप व्यक्त करताना ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. पवारांच्या भूमिकेचे समर्थन करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितले, ते योग्य आहे. विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारे जोडे मारणे करु नये. याबाबतीत मी सहमत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सर्व सदस्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन, यापुढे होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागले.
स्वातंत्र्यवीरांविरुद्ध बोलणं चुकीचं
सावरकरांबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा निषेध झाला पाहिजे. आम्ही त्याचा निषेध करतो. मी सत्तारुढ पक्षाच्या वतीने अध्यक्षांना आश्वस्त करतो की, अशा प्रकारे सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही. हे योग्य नाही. यासाठी सभागृहाचं आवार नाही. समोरच्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की, या देशाच्या स्वातंत्र्यावीरांविरुद्ध अशा प्रकारचं त्यांनी बोलणं चुकीचं आहे. या सभागृहात दोन्ही बाजूने जे बोलले गेले, त्यात काही चुकीचे असेल तर तपासून घ्यावे आणि चुकीचे असेल, तर काढून टाकावं, अशी विनंदी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्याक्षांना केली.
How can we tolerate the continuous insults & venom by Rahul Gandhi towards our Nation's great son, revolutionary Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar? He has to stop doing such condemnable acts!
या देशाचे महान सुपुत्र आणि थोर क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर… pic.twitter.com/l5LIk3Pgew— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 23, 2023
हे भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का?
त्याचवेळी या देशाचे सुपुत्र, खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचे स्फुर्तीस्थान असणारे स्वातंत्रयवीर सावरकर यांच्याबद्दल
ज्या हीन प्रवृत्तीने जे काही बोललं जातंय, ते बोलणं देखील बंद केले पाहिजे. कारण सावरकरांनी जे भोगलं आहे,
ते कुणीच भोगलेलं नाही. 11 वर्षे तोलूचा बैल बनवून सावरकर अंदमानच्या कारागृहात (Andaman Jail)
अनन्वित अत्याचार सहन करत होते. तरीही वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणत होते.
भारत माता की जय म्हणत होते. अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेकजण वेडे झाले.
मात्र, सावरकरांनी सहन करत संघर्ष केला. त्यामुळे भगतसिंगांनी (Bhagat Singh) सावरकरांनी छापलेले
आत्मचरित्र मॅझिन वाटण्याचे काम केले. हे इतिहासात नमूद आहे. हे कोण आहेत,
हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी करत विरोधकांना सुनावले.
Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis slams rahul gandhi and congress over statement on savarkar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अॅन्टी करप्शनच्या जाळयात