Devendra Fadnavis | ‘अली जनाब उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?’, मालेगावातील बॅनरवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची आज मालेगावात पहिल्यांदाच जाहीर सभा होत आहे. ठाकरेंच्या या सभेसाठी (Uddhav Thackeray Rally in Malegaon) जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, मालेगावात उद्धव ठाकरेंचे अनेक ठिकाणी बॅनर लागले असून या बॅनरची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. याच बॅनरवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अली जनाब उद्धव ठाकरेंना भुषणावह वाटतं का? असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे. मालेगाव हा मुस्लिम बहुल भाग आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. यावरुन शिवसेना शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मालेगाव येथील उर्दू बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले,
अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे,
त्या भाषेत कोणी काही म्हटलं तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालन च्या विरोधात आहोत. काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीसोबत (NCP) जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना द्यावं लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

काय लिहिलंय बॅनरवर?
मालेगावात लावण्यात आलेल्या बॅनरवर उर्दू भाषेत लिहिले आहे की, ‘अब हमे जितने तक लढना है:
अली जनाब उद्धव साहब ठाकरे’

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis slams uddhav thackeray over urdu banner in malegaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश