Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये (School Student) पोर्नोग्राफिक बाबत जागृतीची गरज आहे. सध्या त्यांना यासंदर्भातील कंटेट सहजपणे उपलब्ध होतो. त्यामुळे पॉर्नोग्राफिक कंटेटवर (Pornographic Content) नियंत्रणासाठी व अशा विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात विशेष सायबर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली. उमा खापरे (Uma Khapare) यांनी माटुंगा येथील बीएमसीच्या शाळेत तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्यावर लक्षवेधी उपस्थिती केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श (Good Touch-Bad Touch) बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरिया व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राज्यात किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलीस दिदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पोलीस दिदींची संख्या वाढविण्यात येत आहे. यात खासगी स्वयंसंस्थांचाही सहभाग घेत आहोत.
शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून
शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बृहत कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती/ कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील,
अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्री यांनी दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शाळा-महाविद्यालयाजवळील कॅफेंवर
निर्बंध घालण्याची मागणी केली. या कॅफेंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाईट सवयी निर्माण होतात व
त्यातून गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,
या कॅफेंची तपासणी करण्याबाबत विचार केला जाईल असे सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis special cyber project in the state steps will be taken by the state government to crack down on pornographic disorders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….