Devendra Fadnavis | खा. कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान (PM) तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पहायचे आहे, अशी मोठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी व्यक्त केली होती. खासदार अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. स्वप्न कुणीही पाहू शकते, कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

खासदार अमोल कोल्हे हे पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) भोसरी (Bhosari) विधानसभेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे आवश्यक आहे. शरद पवार पंतप्रधान, तर अजित दादांना मुंख्यमंत्रीपदावर बसलेले पहायचे आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले होते. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

 

कुणी स्वप्न पहायला हरकत नाही

अमोल कोल्हे यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पहायला काही हरकत नाही.
स्वप्न कोणीही पाहू शकते. या तिन्ही पक्षात समन्वय नाही, ते आधीपासून सांगत आलो आहे.
त्यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्या-त्यांच्यात अडचणी निर्माण होत आहेत.
त्यांच्यात समन्वय नाही, इथपर्यंत ठीक आहे, परंतु यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेला त्रास होतोय, त्याचे काय,
अशी विचारणा करत जनतेसाठी स्वप्न बघा, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर (aghadi government) निशाणा साधला.

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis talk on statement of mp amol kolhe of sharad pawar as a pm and ajit pawar as a cm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी करणारे चारजण गुन्हे शाखेकडून गजाआड, रिक्षासह 6 दुचाकी जप्त

Pune Crime | उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी झाली वाढ; जाणून घ्या पुणे शहरातील इंधनाचे दर