Devendra Fadnavis | TRP कसा वाढवायचा शरद पवारांना माहिती, राजीनाम्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन टोला लगावला. ते म्हणाले, मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार. टीआरपी (TRP) कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली. पुण्यात गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (National President J.P. Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), सीटी रवी (CT Ravi), विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), प्रवीण दरेकर (Praveen Darekar), नारायण राणे (Narayan Rane), गिरीश महाजन (Girish Mahajan), आशिष शेलार (Ashish Shelar), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट तर महाराष्ट्रात माझ्या लक्षात आलेली नाही. टीआरपी कसा घेयचा त्याचं एक प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर (Resignation) आक्रोश करेल, मग माझाच पक्ष ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन. मग मीच माझ्या जागी परत येईल. त्यांनी कागद दिलाच नाही, पण त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितलं राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातील फरक काय आहे, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी, जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे.
दुसर्‍यांच्या बळावर ते बनता येत नाही. कुणाचे कितीही बळ घेतले तर वाघ तर बनता येते, पण, तो वाघ सर्कशीतील असतो. स्वत:च्या बळावर वाघ झालात, तरच तो जंगलाचा राजा असतो असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

यांची लोकशाहीची व्याख्या काय?

– संजय राऊतांना (Sanjay Raut) बेल मिळाली की लोकशाहीचा विजय, नवाब मलिकांना (Nawab Malik) बेल
नाही मिळाली की, लोकशाहीची हत्या.
– विश्वासघात पासून ते विचार विसर्जनापर्यंत
– खंडणीखोरीपासून ते दाऊद संबंधाच्या मंत्रिमंडळापर्यंत
– अडीच वर्षातील मंत्रालयातील अडीच तास ते कर्तव्यशून्यता
– पत्रकारांपासून ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गळचेपी
– पोलीस बदल्यांतून वसुली ते पोलीस दलाच्या (Maharashtra Police) गैरवापरापर्यंत असे सगळे झालेले प्रकार

Web Title :   Devendra Fadnavis | devendra fadnavis targets sharad pawar over ncp resign uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर