Devendra Fadnavis | राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘सत्तेच्या मस्तीत कसेही वागुन घ्या, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी शनिवारी सकाळी मातोश्रीवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठन करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर सकाळपासून शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार निवासस्थानी राडा घातला. दरम्यान आता नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीसांनी (Mumbai Khar Police) अटक (Arrested) केली आहे. त्यांची आजची रात्र ठाण्यातच असणार आहे. त्यांच्यावर कलम 153 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्वीटद्वारे म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले, आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला, साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा, साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर, थेट अटक” असं ते म्हणाले. तसेच, “इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मर्दुमकी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे, निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?” अशा शब्दांत त्यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis targets thackeray government over rana couples arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा