Devendra Fadnavis | पक्षाध्यक्षांच्या सूचनेनंतर देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे जाहिर केले. मात्र, यानंतर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) म्हणून काम करावे असे आदेश दिले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी ट्विट करुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती दिली.

 

 

अमित शाह म्हणाले, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विनंतीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

 

दरम्यान राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती दिली होती.
मात्र दिल्लीतून वरिष्ठांनी फडणवीस यांना सत्तेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
सुरुवातीला एकच खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे असे सांगितल्यानंतर राजभवनात आणखी एक खुर्ची वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis to be the deputy cm of maharashtra amit shah makes announcement twitter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा