Devendra Fadnavis | फडणवीसांचा डाव उलटणार? नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत (Assembly) सादर केलेल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाची (Pen Drive Case) सीबीआय चौकशीची (CBI Inquiry) मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार (State Government) या प्रकरणाची सीआयडी चौकशी (CID Inquiry) करण्यावर ठाम आहे. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आणखी एक पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला. या पेन ड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची (Dawood Ibrahim) माणसं वक्फ बोर्डात (Waqf Board) नियुक्त करण्यात आली आहे. या दोघांमधील संवाद समोर आला आहे.

 

परंतु याच दरम्यान नवी माहिती समोर आली आहे. अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी सना मलिक शेख (Sana Malik Sheikh) यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमधून मोठी माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी दाऊद गँगचा (David Gang) संबंध असल्याचा आरोप केलेला आरोपी मुदाससीर (Mudassir) यांची नियुक्ती फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात झाली होती, असं त्यांनी ट्विट केलं आहे. वक्फ बोर्डावर नियुक्ती ही नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती.

 

 

नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार होते.
नवाब मलिक यांची मुलगी सना शेख यांनी फडणवीस आणि मुदाससीर यांचा फोटो ट्विट करत आरोप केले आहेत.
त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

 

Advt.

 

Web Title :- Devendra Fadnavis | dr lambe was appointed a waqf board member by devendra fadnavis big information from the daughter of nawab malik sana malik sheikh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’

 

Ajit Pawar | ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या – अजित पवार

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब; महाविकास आघाडी सरकारला आणखी एक झटका