पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस 2019 च्या जखमा आठवत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळयांचे आभार मानत ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जनतेने कौल देऊन सुध्दा तो हिसकावून घेण्यात आला. एकप्रकारे जनतेशी विश्वासघात केला गेला. सुरूवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्याप्रकारे आपल्या नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला. मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. (Mahayuti Govt)
फडणवीस म्हणाले की, 2022 ला आपलं सरकार स्थापन झाले. त्यानंतर आज प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं. आजच्या निकालाने महाराष्ट्रात इतिहास घडला आहे. आता जबाबदारी वाढली आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा आणि समाजातील दलित, ओबीसी, वंचित सगळ्यांनीच जो जनादेश आपल्याला दिला आहे त्याचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आपण सुरू केलेल्या योजना, दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे प्राथमिकता असेलच, त्यासोबत महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहायचे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी 24 तास सरकार काम करेल. जनतेच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चार गोष्टी मनाविरूध्द झाल्या तरीही मोठ्या उद्दिष्टासाठी काम करू
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, अन्य वरिष्ठ नेते तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या संपूर्ण टीमचे आभार मानत फडणवीस म्हणाले की, पुढची वाट अपेक्षापूर्तींसाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एकदिलाने सर्व मित्रांना सोबत घेऊन काम करायचे आहे. आपण मोठं उद्दिष्ट घेऊन राजकारणात आलो आहोत. केवळ पदांसाठी राजकारणात नाही. येत्या काळात 4 गोष्टी मनासारख्या, 4 गोष्टी मनाविरूध्द होतील तरीही एका मोठ्या उद्दिष्टाने आपण काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ असा संदेश ही फडणवीस यांनी दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#