Devendra Fadnavis | नियमित बील भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा न कापण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जे शेतकरी नियमित वीज बील भरत आहेत, तसेच ज्यांनी चालू महिन्याचे शेतपंपाचे बील भरले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चालू बील भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

 

वीज बील न भरल्याने अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरु असते. शेतकऱ्यांनी बील भरावे यासाठी शासन शेतकऱ्यांच्या शेतावरील वीज काढण्याची शक्कल लढवते. पण कित्येक वेळा याचा फटका नियमित बील भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसतो. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी आल्या होत्या. अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकरी नियमित वीज बील भरु शकले नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील सूट देण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिले आहेत. फडणवीस यावेळी म्हणाले, ज्यांना नुकसान झाले नाही, त्यांनी वीज बील भरा. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली नंतर करता येईल.

वीज वितरण कंपन्यांनी वीज तोडल्याने विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही.
त्यामुळे पिके सुकून जात आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे.
थकलेली वीज बिले शेतकऱ्यांकडून वसूल करण्यासाठी अनेक वीज कंपन्यांनी राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत केला आहे.
त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात शेती पंपांची जोडणी तोडण्याची मोहीम राबवली जात आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | electricity connections of farmers who have paid current bills should not be disconnected devendra fadnavis instructions to officer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना